– शिक्षक दिन व अकॅडमीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, २२ ऑगस्ट : येथील लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन व अकॅडमीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील विद्यार्थ्यां करिता सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता एम. आय.डी. सी. ग्राउंड, कोटगल रोड, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रवेश घेण्याकरिता प्रवेश शुल्क फक्त ३० रुपये ठेवण्यात आले असून स्पर्धेत सहभागी होण्याकरिता १ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता पर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा. या स्पर्धेत प्रथम बक्षीस ३००१ रुपये, द्वितीय बक्षीस २००१ रुपये, तृतिय बक्षीस १००१ रुपये, चतुर्थ व पाचवे बक्षीस अनुक्रमे ५०१ रुपये तसेच प्रोत्साहनपर बक्षिस पहिल्या २० विजेत्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके देण्यात येणार आहे. सदर सामान्य ज्ञान स्पर्धा मराठी व्याकरण २५ प्रश्न (२५ गुण), अंकगणित २५ प्रश्न (२५ गुण), सामान्य ज्ञान २५ प्रश्न (२५ गुण), चालू घडामोडी व गडचिरोली जिल्हा १५ प्रश्न (१५ गुण), इंग्रजी व्याकरण १० प्रश्न (१० गुण) या वर आधारित असणार आहे. तरी या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे संचालक तथा मुख्य मार्गदर्शक प्रा. राजीव खोबरे सर व प्रा. आशिष नंदनवार सर यांनी केले आहे.
प्रवेशाकरिता राजीव सर 9404690021 नंदनवार सर 8275549519 या क्रमांकावर संपर्क करावे.