– विविध तालुक्यात क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी व कुरखेडा या तालुका मुख्यालयायातील मुक्तिपथ तालुका कार्यालयात आयोजित व्यसन उपचार क्लिनिकचा लाभ घेत एकूण ४६ रुग्णांनी दारूमुक्तीकडे वाटचाल सुरु केली आहे.
तालुक्यातील रुग्णांना उपचार मिळावा, या उद्देशाने मुक्तिपथ तर्फे बाराही तालुक्यातील मुख्यालयात नियोजित दिवशी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केले जाते. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना समुपदेश करीत औषधोपचार करण्यात येते. बुधवारी देसाईगंज तालुका क्लिनिक ११, गुरुवार एटापल्ली ७, मुलचेरा ७, शुक्रवार अहेरी ७, चामोर्शी ८ व कुरखेडा ६ अशा एकूण ४६ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा ध्यास घेतला आहे. दरम्यान रुग्णांना दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात आदींची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. विशेष म्हणजे, उपचार घेतलेल्या रुग्णांच्या घरोघरी भेट देऊन पाठपुरावा सुद्धा केला जातो. यामुळे रुग्णाची सध्याची स्थिती माहित होण्यास मदत होते.