The गडविश्व
गडचिरोली : सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, सोमवार, दि.04 एप्रिल 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुकास्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात ( प्रपत्र -1 अ ते 1 ड ) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल. तसेच तक्रार /निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करुन सामाजिक अंतर, मास्क वापरणे अनिवार्य आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.