५४ रुग्णांनी घेतला तालुका क्लिनिकचा लाभ

307

५४ रुग्णांनी घेतला तालुका क्लिनिकचा ला
The गडविश्व
गडचिरोली : दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या विविध तालुक्यातील ५४ रुग्णांनी जिल्हाभरात सुरु असलेल्या तालुका क्लिनिकला भेट दिली. यामाध्यमातून उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध करून देण्यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे बाराही तालुका मुख्यालयी तालुका क्लिनिक सुरु करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत अनेक रुग्णांनी या माध्यमातून उपचार घेतला. सोबतच रुग्णांना दारूचे दुष्परिणाम, दारूची सवय कशी लागते, धोक्याचे घटक, उपचार घेतल्यास व्यसनातून मुक्त होण्यास मदत होते अशी माहिती देत समुपदेशन सुद्धा केले जाते. या क्लिनिकमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांचा दरमहिन्याला नियमित पाठपुरावा घेतला जातो. यामुळे रुग्णाची सध्यास्थिती लक्षात येते.
मागील आठवड्यातील सोमवारी आरमोरी येथील क्लिनिकमध्ये ७, बुधवारी वडसा १२, गुरुवारी एटापल्ली व मुलचेरा ९, शुक्रवारी कुरखेडा येथील क्लिनिकला ८ रुग्णांनी भेट दिली तसेच अहेरी व सिरोंचा क्लिनिकमध्ये प्रत्येकी ९ रुग्णांनी उपचार घेतला. अशा एकूण ५४ रुग्णांनी तालुका क्लिनिकला लाभ घेतला. दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांनी तालुका क्लिनिकमध्ये उपचार घेण्याचे आवाहन, मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here