The गडविश्व
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात एकलव्य निवासी शाळांमध्ये इयत्ता 6 वी वर्गात प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या व इयत्ता 7 वी ते 9 वीचे वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्याची शासकीय व अनुदानित आश्रमशाळा,जिल्हा परीषद,नगरपालीका,महानगरपालीका व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील अनुसूचित /आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता स्पर्धा परिक्षेचे आयोजन दिनांक 5 जून 2022 रोजी सकाळी 11.00 ते 13.00 या वेळेत करण्यात आले आहे.
इयत्ता 6 वी ते 9 वीच्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले असून सदर प्रवेश फार्म प्रकल्प कार्यालयाद्वारे तपासणी करुन विद्यार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले आहे. याची यादी परीक्षा केंद्रनिहाय लावण्यात आलेली आहे.सदरची प्रवेशपूर्व परीक्षा चामोर्शी,गडचिरोली व धानोरा तालुक्यातील शाळांमध्ये शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,गडचिरोली येथे तसेच वडसा,कुरखेडा,कोरची, आरमोरी या तालुक्यातील शाळांमध्ये शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,सोनसरी या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजता हजर राहावे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सुरक्षिपणे आणण्याची जबाबदारी संबंधित आश्रमशाळा,जि.प. अनुदानित व इतर शाळांच्या मुख्याध्यापक/शिक्षकांची आहे. परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,गडचिरोली अंकित यांनी केले आहे.