The गडविश्व
गडचिरोली : कोरची शहरातील वॉर्ड क्रमांक ७ मधील दारूविक्रेत्याकडील ६० किलो मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कारवाई कोरची पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या बुधवारी केली.
कोरची शहरातील वॉर्ड क्रमांक १,७,८,९,१४ व १५ मध्ये अवैध दारूविक्री केली जाते. दरम्यान शहरातील अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्यासाठी मुक्तिपथ अभियानचे उपसंचालक संतोष सावळकर यांच्या उपस्थितीत कोरचीचे पोलिस उपनिरीक्षक व्हि.एम. सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक पार पडली. यावेळी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार शहरातील वार्ड क्रमांक ७ मध्ये मुक्तिपथ तालुका चमू व पोलिसांनी संयुक्तरित्या अहिंसक कृती करीत एका घराची तपासणी केली. यावेळी ६० किलो मोहफुलाचा सडवा, दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण मिळून आलेला ८ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.