The गडविश्व
गडचिरोली, ५ सप्टेंबर : जिल्ह्यातील दारूचे व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या ८६ जणांनी विविध तालुका क्लिनिकला भेट देऊन उपचार घेतला. रुग्णांना योग्य औषोधोपचार करीत समुपदेशन सुद्धा करण्यात आले. यामुळे व्यसनातून मुक्त होण्यासाठी रुग्णांना मदत होणार आहे.
मुक्तीपथ अभियानातर्फे बाराही तालुक्यात नियोजित दिवशी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक रुग्ण उपचारातून बरे झाले आहे. आरमोरी तालुका क्लिनिकमध्ये १९, वडसा २३, एटापल्ली ११, अहेरी १३ व चामोर्शी २० अशा एकूण ८६ रुग्णांनी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून पूर्ण उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रुग्णांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. यामुळे व्यसनातून मुक्त होण्यासाठी रुग्णांना मदत होणार आहे. जिल्हयातील १२ ही तालुक्यात सुरु असलेल्या तालुका क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तीपथ अभियानाने केले आहे.