– नागपुरचे तज्ञ व अनुभवी डॉ. विरेश गुप्ता करणार तपासणी
The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोलीच्या दुर्गम भागात मागच्या ३० वर्षांपासून सतत सेवा पुरवत असलेल्या माँ दंतेश्र्वरी दवाखान्यात शनिवार ०९ जुलै रोजी मूत्रपिंड विकार ओपीडी उपलब्ध असणार. या सुविधांमुळे गडचिरोली आणि जवळपासच्या जिल्ह्यातील रुग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधांसाठी मोठमोठ्या शहरांमध्ये जाण्याची आता गरज राहणार नाही. १४ मे ला सुरू झालेल्या मुत्रपिंड स्पेशालिटी ओपीडी ची सुविधा आता रुग्णांसाठी दर महिन्याचा दुसर्या शनिवारी ही ओपिडी उपलब्ध करण्यात आली आहे.
मूत्रपिंडाचे आजार हे नुसते दुर्मिळ आजारच नसून, याचा उपचारही खर्चिक असतो. पण सर्च हॉस्पिटल च्या रूपाने सवलतीच्या दरात किंवा मोफत या सुविधा पुरवल्या जात आहे. लघवीत रक्त येणे, अनेक वर्ष मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणारे रुग्ण, अनियंत्रित रक्तदाब, पायावर, चेहऱ्यावर किंवा शरीरावर सूज, लघवी कमी होणे, डायलिसिस वर असणारे रुग्ण, लघवीला झालेला जंतू संसर्ग अशा अनेक अडचणींवर आणि रोगांवर येथे तपासणी होते. नागपुरचे तज्ञ तसेच अनुभवी डॉ. विरेश गुप्ता त्याचे सल्ला व उपचार या वेळी देतिल. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी डॉ.विरेश गुप्ता ही सुविधा सर्च हॉस्पिटल च्या माध्यमातून पुरवतील.