– महाराष्ट्र राज्य ग्रा.पं. क.युनियन शाखा देसाईगंजचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
देसाईगंज : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता विधान भवन मुंबई येथे मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गडचिरोली जिल्हयातील देसाईगंज तालुका शाखा सहभागी होणार असून तसे निवेदन पंचायत सतिती देसाईंगंज येथील गडविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील २७ हजार ९२० ग्रामपंचायतमध्ये काम करीत असलेल्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मागील २० वर्षापासून प्रलंबित आहे. याबात ग्रामपंचायत कार्यालयांचा १० जुलै २०१८ रोजी नागपूर येथील लॉंग मार्च व ७ जानेवारी २०१९ रोजी लातून येथे भव्य अधिवेशन आयोजीत करण्यात आले होते. १० जुलै रोजी २०१८ रोजी तत्कालीन ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन दिले. त्याचा इतिवृत्त उपलब्ध आहे. तसेच ७ जानेवारी २०१९ रोजी लातूर येथे ग्रामविकास व कामगार मंत्री यांनी अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासन दिले होते. तसेच २० जानेवारी २०२० रोजी राज्यातील ३४ ही जिल्हयातून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मागण्यासंबंधी अदयापही निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून येत्या ९ मार्च २०२२ रोजी मुंबई येथे निर्धार मोर्चाचे अयोजन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हयातील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा देसाईगंजच्या वतीने ४ मार्च रोजी प्रलंबीत मागण्यासंदर्भात विधान भवन येथील मोर्चास सहभागी होत असल्याचे देसाईगंज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सलाम यांना निवेदनातून कळविले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष योगेश ढोरे, महेंद्र नरूले, प्रदिप तुपट, नरेश नेवारे, प्रमोद ठेंगरी, धनंजय मुंडले, कैलास नाकाडे, धनंजय सुर्यवंशी, देवेंद्र मारबते, गजानन मेश्राम, गणपत वाघाडे, आदी ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.