The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०९ : तालुक्यातील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ जानेवारी २०२५ रोजी शंभर दिवसीय टि.बि.मुक्त भारत अभियान कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.
टि.बी.मुक्त भारत अभियानात साठ वर्ष वयोगटातील स्त्री-पुरुष आणि रांगी प्राथमिक आरोग्य परिसरातील जुने टी.बि. रुग्ण त्यांच्या कुटुंबातील आणि सहवासातील बी .एम .आय. कमी असलेल्या रुग्ण आणि धूम्रपान करणारे असे एकूण ६३ लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यात संशयित टी.बी रुग्ण १२ व्यक्तीचे बेडका रक्त नमुने घेण्यात आले. ७ व्यक्तिचे एक्सरे नमुने घेऊन पाठविण्यात आले. १७ लाभार्थ्यांचे ईसिजी करण्यात आले. ५३ लाभार्थ्यांचे LFT, KFT व cbc करण्यात आले. सदर शिबिराला डॉ. पूजा धुर्वे वैद्यकीय अधिकारी रांगी, एस. एन. राजगडे आरोग्य सहाय्यक, हीचामी आरोग्य सहाय्यक, वंदना शेंन्डे परिचारिका, शैलेश जांभुळे प्रयोग.शाळा.वै.अधि, अंकित हेमके औषध निर्माण अधिकारी, श्रीमती हिचामि आरोग्य सेविका, आशा सेविका अनिता चापळे, ज्योती पेंदाम व गावकरी उपस्थित होते.
सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा रांगी च्या वतिने गावात प्रभात फेरी काढण्यात आली. शंभर दिवशीय टि.बी.मुक्ति साठी विविध नारे देत जनजागृती करण्यात आली. यावेळी गावकरी उपस्थित होते.