The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा – कोरची, दि. २२ : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित श्रीराम कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोरची चा इयत्ता १२ वी विज्ञान विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
विज्ञान विभागातून कु. अनुष्का बाबुलाल शेंडे ७०.५० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम त्याचबरोबर कु. उत्कर्ष उकेश मोहुरले ६९.६७ टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर कु. झाशीका तिलक मांडवे हिने ६८.३३ टक्के गुण मिळवून तृतीय मिळवला आहे .
गुणवंत विद्यार्थ्यांचे प्राचार्य गोबाडे सर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या यशाचे श्रीराम कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोरची चे शाळा समिती अध्यक्ष तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना महाविद्यालयाचे प्राचार्य गोबाडे, प्रा. भांडारकर, प्रा.झोडे, प्रा. अंबादे आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #hscresult 2024 #12thresult2024 )