देवांगना सेलोटे हि लाखांदूर तालुक्यातील मेंढा या गावची राहणारी. घरी आईबाबा दोन भाऊ आणि आपण असा पाच लोकांचा कुटुंब.जन्मता: एका पायाची आणि एका हाताची नैसर्गिक देणगी प्राप्त झालेली देवांगना अतिशय चुणूक बुद्धीची आणि हौसी मुलगी, तिचा शिक्षण ११ पर्येंत झालेला आहे, ती स्वभावाणे अतिशय प्रांजळ आणि लाघवी आहे. वागताना नम्र आणि सज्जनशिलतेने वागतोय, दिव्यांग व्यक्तीबद्दल प्रत्येक व्यक्तीचा असा गैरसमज असतोय कि, दिव्यांग व्यक्ती अपंगत्वामुळे काहीच करू शकत नाही, अपंग व्यक्ती जन्माला येणे म्हणजे पूर्व जन्मीचा पाप कटवायला आला असेल, म्हणून पुर्वग्रह दुशिताला घेऊन कुटुंबीय, नातेवाईक आणि समाज बोलत असतो, पण आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा,यांनी हा गैरसमज मुळातून काढण्यासाठी दिव्यांग व्यक्तीच्या अधिकारावर काम करून शासकीय योजनांच्या समन्वयकाने त्यांचा पुनर्वसन करण्याचा पायंडा रोवून २००१ पासून काम करीत आहे, या कामाची सुरुवात कोरची आणि कुरखेड्यापासून झाली असली तरी आज त्या कामा ची व्याप्ती पूर्ण विदर्भ स्तरावर पोहचलेली आहे, त्या कामाच्या अनुषंगाने पुढे आलेली देवांगना सेलोटे हिला संस्थेच्या वतीने विणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले, आज ती सुगरण आपल्या कलेच्या सहाय्याने आर्थीक बाबीकडे वळली आहे, तिला बघितला तर अस वाटते ती काहीच करू शकत नाही पण, आचाट अशी कल्पना आणि अव्याप्त अशी कौशल्याच्या नैसर्गिक देणगीवर देवांगना काम करीत आहे, ती आपल्या रिकाम्या वेळात महिलांच्या गाठ्या अगदी फासेमंद गाठ्या ओवून देते, फुलांचे गजरे आणि हारी तयार करते, रोज हार तयार करून देवाला अर्पण करणे हा तिचा नित्य उपक्रम आहे, त्याच अनुषंगाने आणि घेतलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ती आसन, पायदान, चटई विणून विकते, तिची ती कला पाहून प्रख्यात कवयत्री भूमीकन्या बहिणाबाई चौधरी यांची कविता नकळत ओठावर येतो, ती म्हणजे
“अरे खोप्या मध्ये खोपा. सुगरणीचा चांगला.
देख पिल्यासाठी तिन. खोपा झाडाला टांगला,
पिल निजली खोप्यात,जसा झुलता बंगला.
पाखराची कारागिरी जरा देखरे मनसा,
तिची उलुसीच चोच. तेच दात तेच ओठ.
तुला देले रे देवान, दोन हात दहा बोट “
जसी सुगरण पक्षीण आपल्या कलेने आपल्या संरक्षणार्थ आपल्या चोचीने एक –एक सिंदीच्या पानोऱ्या गोळा करून आपल्या कलेने सुंदरसा खोपा बनविते, तसीच देवांगना हि आपल्याला एकच हात आणि एकच पाय देवाने दिलेले आहे, त्याची तक्रार न करता नित्यनेमाने देवाला स्वतः बनवून हार अर्पण करते, आपल्या एका हातावर आणि एका पायावर आपला परिचलन करते कधी कोणाकडे कशाची अपेक्षा करीत नाही, स्वत:ला कमी समजत नाही, आपल्या कलेच्या सहाय्याने सगळे कामे करते, दिव्यांग व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे जगण्यासाठी लागणारा आत्मविश्वास अपंगत्वामुळे गहाळ झालेला असतो, त्या आत्मविश्वासाला जागृत करण्याची गरज आहे, त्यांच्या मध्ये निसर्गत: उपजत कला असतात. त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण समाज म्हणून केला तर दिव्यांग व्यक्ती मानसन्मानाच्या प्रवाहात यायला काही अवधी लागणार नाही, दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात प्रचंड इच्छा शक्ती आणि काहीतरी करण्याची आवड असली तर सवड मिळतो, म्हणून आपल्या अपंगत्वाचा बाहू न करता अपंगत्वाला आपल्या कर्तुत्वाने कस हरवीता येईल याच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कुशाग्र बुद्धीच्या आणि चानक्ष वृत्तीच्या आपल्या देवांगना ताई आहेत.