– आस्था कोलते शाळेतून प्रथम
The गडविश्व
गडचिरोली, ४ जून : नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. या दहावीच्या निकालात सोनापूर गडचिरोली येथील Success कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घेत शिखर गाठले आहे.
राहुल सर यांच्या Success कोचिंग क्लासेस मधील आस्था कोलते हिने गणित विषयात १०० पैकी ९५ गुण पटकावत दहावीत ९३.८० टक्के प्राप्त करत शाळेतुन प्रथम, तन्वी तोटपल्लीवार गणित विषयात १०० पैकी ९२ गुण पटकावत ९२.६० टक्के प्राप्त करत द्वितीय, जागृती मेश्राम १०० पैकी ९५ गुण पटकावत ९२ टक्के प्राप्त करत तृतीय, रिंकू डुंबरे (गणित ९४) ९१.८० टक्के, कल्याणी कुमरे (गणित ९३) ८९.६० टक्के, भाग्यलक्ष्मी कोल्हे (गणित ९३) ८९.६० टक्के, तेजस्वी म्हाशाखेत्री (गणित ८८) ८९.६० टक्के प्राप्त करत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक तसेच Success कोचिंग क्लासेस चे राहुल सर यांना दिले आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्लासेस चे राहुल सर यांनी कौतुक केले असून विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.