गडचिरोलीत १११ वर्षाच्या सरकारचे मतदान

674

-वृद्ध महिलेच्या मतदानाचा उत्साह सर्वांसाठी आदर्शवत
The गडविश्व
गडचिरोली दि.२० : गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोदविले.
फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजीचा आहे. नातवाच्या दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होत मतदानासाठी बाहेर निघत होते. यातच तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत या १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. वयोवृद्ध फुलमती सरकार यांनी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी घेतलेला पुढाकार इतर मतदारांपुढे एक आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. तर अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी आदित्य जीवने यांनी फुलमती आजीचे अभिनंदन करुन मतदान प्रक्रियेत नोंदवलेल्या सहभागाबद्दल धन्यवाद दिले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here