५३३ गावांसह १२३ वार्डानी घेतला दारूमुक्त निवडणुकीचा ठराव

115

The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : लोकसभा निवडणूक दारूमुक्त व्हावी, यासाठी 533 गावांसह 123 वार्डातील मतदारांनी मतदान दारूमुक्त व शांततेत होण्यासाठी मी दारू स्वीकारणार नाही, पिणार नाही व पूर्णपणे जागरूक राहून मतदान करणार असा संकल्प करीत दारूमुक्त निवडणुकीचा ठराव पारित केला आहे. मुक्तिपथ च्या वतीने हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला.
मुक्तिपथ व गाव संघटनेच्या माध्यमातून 533 गावांसह 123 वार्डातील ग्रामस्थांना दारूमुक्त निवडणुकीची संकल्पना पटवून देण्यात आली. पूर्ण शुद्धीत राहून मतदान करता येते, योग्य उमेदवार निवडता येते. गावाची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात भांडणे शक्यतो होत नाही. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. हे दारूमुक्त निवडणुकीचे फायदे लोकांना पटवून देण्यात आले. जिल्हाभरात दारूमुक्त निवडणुकीचे आवाहन करणारे बॅनर पोस्टर लावून जागृती करण्यात आली.
निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पुर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप न झाल्यास निवडणूक शांततेत पार पडणार, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये, याची काळजी घ्यावी. असेही आवाहन करण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांनी सुद्धा दारूबंदीचे समर्थन करीत मतांसाठी दारू वाटप करणार नाही, असा संकल्प केला आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणुक दारूमुक्त होणार आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktupath #loksabhaelection)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here