– विविध गावात पोहोचली व्हिडीओ व्हॅन
The गडविश्व
गडचिरोली, ३ मार्च : दारू व तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती गावा-गावात पोहचविण्यासाठी मुक्तीपथ अभियानातर्फे व्हिडीओ व्हॅन सुरू करण्यात आली आहे. या व्हॅनच्या माध्यमातून गडचिरोली तालुक्यातील विविध शाळांतील 1756 विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक चित्रफिती दाखवून व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मुक्तीपथ अभियानातर्फे सुरू करण्यात आलेली व्हिडीओ व्हॅन जिल्हाभरातील गावागावात पोहचून जनजागृती करीत आहे. या माध्यमातून यमराजाचा फास, शाब्बास गण्या, व्यसन उपचार हे चित्रपट दाखवून दारू व तंबाखूच्या व्यसनासंदर्भात लोकांना माहिती दिली जाते. गडचिरोली तालुक्यातील गिलगाव, बेलगाव , मौशिखंब, पोर्ला, काटली, चुरचुरा, कोटगल, इंदाळा, पारडी या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व हायस्कूल शाळेतील एकूण 1756 विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवून जागृत करण्यात आले.सोबतच आंबेटोला, चुरचुरा, राखी, बोदली या गावातील मुख्य चौकातही व्हिडीओ व्हॅन लावून जवळपास 670 लोकांपर्यंत संदेश पोहचवण्यात आला. यावेळी मुक्तीपथचे उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी व्यसन उपचार शिबीर, दारूबंदी, सुगंधित तंबाखू विक्री बंदी यावर मार्गदर्शन केले.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The Gdv) (Muktipath)