-जांभळी-सीताटोला जंगल क्षेत्रातील कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : तालुक्यातील जांभळी-घोटविहीर-सीताटोला जंगलपरिसरात अहिंसक कृती करीत जवळपास १९ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने केली. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
जांभळी-घोटविहीर-सीताटोला जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात हातभट्टीची दारु काढून चिल्लर विक्रेत्यांना विक्री केल्या जात असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथने जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. संयुक्तरित्या कारवाई करीत जंगलातील दारुभट्टी उध्वस्त केली. यावेळी घटनास्थळावरुन १९ ड्रम सडवा जप्त करीत जंगलातच नष्ट करण्यात आला.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अरूण फेगडे यांच्या नेतृत्वात धनंजय चौधरी, अविनाश लंजे, तुषार खोबरागडे, वृषाली चव्हाण, मुक्तिपथचे रेवनाथ मेश्राम व धानोरा मुक्तिपथचे भाष्कर कड्यामी व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले असून विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )