८ फेब्रुवारी पासून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे २३ वे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशन

94

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन या वीज कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख व मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे २३ वे राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशयाचे आयोजन गडचिरोली येथील आर. के. सेलिब्रेशन हॉल येथे ८ व ९ फेब्रुवारी २०२५ करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन स्वतंत्र मजदूर युनियन या देशव्यापी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रिय अध्यक्ष डॉ. संजय घोडके हे राहतील. याप्रसंगी वीज कंपन्यांचे प्रस्तावित खाजगीकरण, वाढते कंत्राटीकरण व स्मार्ट मीटरचा विरोध, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे या महत्त्वपूर्ण प्रश्नांवर संघटनेच्या आगामी लढ्याची दिशा ठरविण्यात येणार आहे अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उद्‌द्घाटन समारोहामध्ये महापारेषण कंपनीचे संचालक (संबलन) सतीश चव्हाण व संचालक (मानव संसाधन) सुगत गमरे तथा महानिर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक (मानव संसाधन) डॉ. नितीन वाघ, स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय महासचिव ए. व्ही. किरण व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. के. पी. स्वामीनाथन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर याप्रसंगी दैनिक सकाळचे माजी संपादक तथा प्रसिद्ध लेखक व विचारवंत उत्तम कांबळे यांचे ‘कामगार चळवळ: काल, आज आणि उद्या’ या विषयावर मार्गदर्शन,अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इतिहास संशोधक व लेखक डॉ. श्रीमंत कोकाटे हे ‘समतावादी चळवळीचा इतिहास आणि कष्टकरी समाजाच्या प्रेरणा’ या विषयावर तसेच सामाजिक विचारवंत व लेखक प्रभू राजगडकर हे ‘दलित, आदिवासी समाजाचे प्रश्न व आगामी लब्याची दिशा’ या विषयावर मार्गदर्शन लाभणार असून यावेळी अध्यक्षस्थानी स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. एस. पाटील हे राहतील.
दुसऱ्या दिवशी ९ फेब्रुवारी रोजी कार्यकर्ता प्रबोधन सत्रामध्ये जेष्ठ पत्रकार व दैनिक लोकमत, पुणे चे संपादक संजय आवटे यांचे ‘देश घडविणाऱ्या महापुरुषांची विचारधारा व आम्ही भारताचे लोक’ या विषयावर मार्गदर्शन, अध्यक्षस्थानी संघटनेचे सरचिटणीस प्रेमानंद मौर्य हे राहणार आहेत.
दुसऱ्या सत्रामध्ये संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात येऊन पुढील वाटचालीबाबत संकल्प करण्यात येणार आहे. डॉ. संजय घोडके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सत्रामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून जे. एस. पाटील हे यांचे मार्गदर्शन तसेच कार्याध्यक्ष संजय मोरे, सरचिटणीस प्रेमानंद मौर्य, मुख्य संघटक सूर्यकांत जनबंधु, विधी सल्लागार एन. बी. जारोडे, सल्लागार एस. के. हनवते व राजु गायकवाड हे सुद्धा आपले विचार व्यक्त करणार आहेत. आहेत.
या अधिवेशनामध्ये राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून फुले-आंबेडकरी विचारांची कामगार चळवळ महाराष्ट्र आणि देशात अधिक मजबूत करण्याकरिता हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरेल अशी माहिती संघटनेचे झोन अध्यक्ष चंद्रकांत सेडमेक, झोन सचिव मा. कुणाल पाटील, दयानंद हाडके, गौतम रामटेके, विनय मोटघरे,अनिल झाडे, नरेंद्र डोंगरे, जे. पी. मेश्राम, सुधीर चौधरी, मिथुन शेंडे, थाटकर, रवींद्र वाकडे, जे. सी. रामटेके, विजय दिवटे, योगेश सलामे, विजय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here