The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी ( प्रवीण जोशी), ११ मार्च : दि. यवतमाळ अर्बन को-ऑप बँक लिमी., यवतमाळ या बँकेची शाखा ढाणकी येथे १० मार्च १९९४ रोजी सूरू झाली. बँकेच्या ढाणकी शाखेच्या सेवेला १० मार्च २०२३ रोजी २९ वर्ष पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वर्धापन दिनाच्या पुर्वसंध्येला कार्यक्रमाचे शाखेत आयोजन करण्यात आले. बँकेने चालू आर्थिक वर्षात ठेवीच्या अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने अमृत कलष योजना, तसेच अमृत संचय योजना नव्यानेच चालू करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बँक विमा सेवा सुद्धा पुरवित आहे. या योजनेचा लाभ ठेवीदारांनी घ्यावा. तसेच थकीत कर्जदारांनी आपल्या कडील थकीत रकमेचा भरणा करून आपला सिबिल रेकाॅर्ड नेहमी चांगला ठेवावा. असे मत शाखाप्रबंधक नचिकेत साकळे यांनी यावेळी व्यक्त केले.
बँक आर्थिक सेवेसोबतच सामाजिक कार्य करीत असते. जसे-वृक्षारोपण, रक्तदान शिबीर घेणे, उन्हाळ्यामध्ये पाण-पोई लावणे, विद्यार्थ्यांचा प्रोत्साहनपर सत्कार करणे, प्रशस्ती पत्र देणे, इत्यादि कार्य करीत असते. कोरोनाच्या काळामध्ये छोट्या व्यावसायिकांना वैयक्तिक कर्ज पन्नास हजार ते एक लाख पर्यंत देवुन त्याच्या व्यवसायाला हातभार लावला आहे. असे मत बँकेचे खातेदार प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.
बँक शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही जुन्या ठेवीदारांचा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदाराचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. तसेच ढाणकी शाखा शुुभारंभाचे वेळेसच्या काही खातेदार असलेल्या मान्यवरांचा, पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित बँकेच्या ग्राहकांचा सत्कार करून त्यांना मिठाईचे वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी बँक स्थापना पासूनच्या माहिती प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी शशिकांत पांडे, अरुण कदम, चंद्रशेखर राठोड, हिम्मत धवणे, शिवाजी कोमवाड, इत्यादीनी परिश्रम घेतले. यावेळी बँकेचे ठेवीदार, ग्राहक उपस्थित होते. काही जुने ठेवीदार, नियमित कर्जदार यांच्या घरी जावून प्रत्यक्ष भेटी घेवून अभिनंदन करण्यात आले अनुप नाईक विभागीय अधिकारी याची विशेष उपस्थिती या वेळेस होती.
(The gadvishva) (The gdv) (Dhanki)