आगीत ३० क्विंटल कापूस जळून खाक ; माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली मदत

204

The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : सिरोंचा तालुक्यातील नरसिहापल्ली येथील चेन्नुरी कुटुंब गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घराला आग लागल्याने काही क्षणातच घरात ठेवलेले ३० क्विंटल कापूस जळून खाक झाले. सुदैवाने कुटुंब थोडक्यात बचावले. हि घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. सदर घटनेची माहिती होताच माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी धाव घेत कुटुंबाची भेट घेऊन विचारपूर करत आर्थिक मदत केली.
सिरोंचा तालुक्यातील नरसिंहापल्ली रवींद्रशंकर चेन्नुरी हे झोपडीवजा घरात वास्तव्यास आहेत. १० तारखेला नित्याप्रमाणे जेवण करून कुटुंब झोपी गेले. मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता संपूर्ण घरात आग पसरली. यात वेचणी करून ठेवलेला ३० क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाला तसेच संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राख झाली. यात अडीच लाखांचा कापूससह घरात असलेल्या अत्यंत आवश्यक असलेल्या कागदपत्रेही खाक झाली. या घटनेचे माहिती स्थानिक आविसं काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनकडून आविसं काँग्रेसचे युवा नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती देताच तात्काळ अजय कंकडालवार यांनी नरसिंहापल्ली येथील घटना स्थळी धाव घेत घटनेचे माहिती जाणून घेऊन.दूरध्वनी द्वारे घटनेचे माहिती संबंधित अधिकाऱ्यांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून.या परिवाराला शासनाकडून मदत करण्यात यावी म्हणून सांगितले आहे. दरम्यान अजय कंकडालवार यांनी चेन्नूरी कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केली.
यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, व्येकटापूर ग्रामपंचायतचे सरपंच अजय पोरतेट, उपसरपंच चिरंजीव चिलवेलवारसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here