३३ हजारांची दारू व मोहफुलाचा सडवा नष्ट

182

-पुराडा पोलिस व मुक्तीपथची संयुक्त कृती
The गडविश्व
गडचिरोली, १३ मार्च : कुरखेडा तालुक्यातील पळसगड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावातील दारूविक्रेत्यांचा ३३ हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई पुराडा पोलिस, मुक्तीपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरीत्या केली.
पळसगड येथे गाव संघटना व मुक्तीपथ यांच्या माध्यमातून दोन विक्रेत्यांकडील २ मोठे मडके मोहसडवा, चालू भट्टी, ६४ देशीचे टिल्लू व २१ इंग्लिश दारूच्या निपा एकूण रक्कम १३ हजार रुपयांचा माल नष्ट केला. सोबतच दारू न विकण्याची ग्वाही दारूविक्रेत्यांकडून घेतली. तसेच उप पोलीस स्टेशन पुराडा व मुक्तीपथ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभारी अधिकारी भूषण पवार यांच्या नेतृत्वात पळसगड ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धानोरी व शिकारी टोला येथे विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. त्यात १० मोठे मडके मोहसडवा, रिकामे मडके, तसेच चालू भट्ट्या व मोहाची दारू काढण्याचे भांडे असा एकूण २० हजार रुपयांचा माल नष्ट करण्यात आला. असा एकूण ३३ हजारांचा मुद्देमाल नष्ट करून दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगितले. यावेळी एएसआय मडकाम, नापोशि जुमनाके, नापोशि अतकरे, भाग्यश्री डोंगरे तसेच मुक्तीपथ तर्फे मयूर राऊत, विनोद पांडे व कान्होपात्रा राऊत हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here