३८ जणांनी तालुका क्लिनिकतुन घेतला उपचार

176

The गडविश्व
गडचिरोली, १४ जानेवारी : रुग्णांना तालुकास्थळी उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तिपथतर्फे तालुका क्लिनिक सुरु करण्यात आली आहे. विविध तीन ठिकाणी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून ३८ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील तालुकास्थळी मुक्तिपथतर्फे व्यसन उपचार तालुका क्लिनिक सुरु करण्यात आली आहे. विविध ठिकाणी नियोजित दिवशी क्लिनिक घेतली जाते. यात रुग्णांना तज्ञांकडून समुपदेशन व योग्य मार्गदर्शन देखील केले जाते. आतापर्यंत अनेकांनी तालुका क्लिनिकचा लाभ घेत दारूच्या व्यसनापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी देसाईगंज येथील क्लिनिकमध्ये १९ रुग्णांनी भेट देऊन पूर्ण उपचार घेतला. तसेच गुरुवारी एटापल्ली १२ व मुलचेरा ७ अशा तीन ठिकाणी आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून ३८ रुग्णांनी उपचार घेतला आहे. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना औषधोपचारही दिले जाते. दारू सोडण्याची इच्छा असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या तालुक्यातील तालुका क्लिनिकला भेट देण्याचे आवाहन मुक्तिपथ अभियानातर्फे करण्यात आले आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Muktipath) (Napoli vs Juventus) (Aston Villa vs Leeds United) (Pakistan vs New Zealand) (Hockey World Cup 2023) (Elvis Presley)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here