-गडचिरोली पोलिस व मुक्तिपथची संयुक्त कृती
The गडविश्व
गडचिरोली,दि. ९ : तालुक्यातील मौशीचक येथील दारूविक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून ४० लिटर दारूसह ४ ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कृती गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली. याप्रकरणी संजय उसेंडी या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौशीचक या गावात अनेक वर्षापासून मोहफुलाची दारू विक्री केली जाते. दारूविक्री साठी कुप्रसिद्ध असलेल्या गावात अमिर्झा, कळमटोला, मौशीखांब, मुरमाडी, कातखेडा या गावातील शौकीन दारू पिण्यासाठी येतात. या गावातील दारूविक्रेत्यांविरोधात वारंवार तक्रारी येत होत्या. अशातच गुप्त महितीच्या आधारे गडचिरोली पोलीस व मुक्तीपथने संयुक्त कार्यवाही करीत दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकली. यावेळी वेगवेगळ्या घरी ४० लिटर दारू व चार ड्रम मोहफुलाचा सडवा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल नष्ट करून संजय उसेंडी या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई सहायक फोजदार जयप्रकाश मेश्राम, हवालदार विजय नंदेश्वर व मुक्तीपथचे संघटक रेवनाथ मेश्राम यांनी केली.