४२ ड्रम साखरेचा सडवा नष्ट

167

– बामणी उप पोलीस स्टेशनची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, २२ एप्रिल : सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद शेत शिवारात दडवून ठेवलेला ४२ ड्रम साखरेचा सडवा, दारू व साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई बामणी उप पोलिस स्टेशन व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या केली.
जाफ्राबाद गावात एकूण 8 विक्रते आहेत. या विक्रेत्यांच्या माध्यमातून मोयाबीनपेठा, रेंगूठा, नर्सिहापल्ली, बोगुटागुडम, पीरमेडा या गावातील किरकोळ विक्रेत्यांना दारूचा पुरवठा केला जातो. गावातील विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी शेतशिवारात मोठ्या प्रमाणात साखरेचा सडवा टाकला असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथक व मुक्तिपथ तालुका चमूने शोधमोहीम राबविली असता, ४२ ड्रम साखरेचा सडवा, ३० लिटर दारू व दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्य असा एकूण ३ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून दारूविक्रेत्यांना चांगलाच धडा शिकवण्यात आला.

(The gdv) (the gadvishva) (gadchiroli news ) (muktipath) (serch gadchiroli) (Bayern vs Man City) (Inter vs Benfica) (JEE MAINs Answer Key) (Mohammed Siraj) (Solar eclipse of April 20, 2023) (Roman Reigns) (Mamata Banerjee) (The Song of Scorpions) (Temperature Humidity Led Display Board )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here