४२ आजी-माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी

42

४२ आजी-माजी विद्यार्थ्यांनी रक्तदान करून जोपासली सामाजिक बांधिलकी
– श्रीराम कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयाचा दहा वर्षापासून चा उपक्रम
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. २५ : आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा तथा वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व संस्कार पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने होवू घातलेल्या कला संस्कार वार्षिक महोत्सवात मागील दहा वर्षापासून कला संस्कार वार्षिक महोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन केल्या जात असून या शिबिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा ४२ आजी- माजी विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने कला संस्कार वार्षिक महोत्सवाच्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. ते.ना.बुद्धे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, संस्था सचिव दोषहर फाये, शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, डॉ. जगदीश बोरकर, प्राचार्य नागेश्वर फाये, संस्था सदस्य इंजिनियर गुणवंत फाये, डॉ. नितीन कटरे, नगरसेवक सागर निरकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, मोनेश मेश्राम, नरहरी माकडे, शामराव सोनुले, नगरसेविका दुर्गाताई गोटेफोडे, नगरसेविका हेमलता नंदेश्वर, कविता खडसे, रूपाली कावळे, उपस्थित होते.
यावेळी डॉ.हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी रक्तसंग्रहण केले व रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या कॉलेजला प्रमाणपत्र व भेटवस्त देऊन सन्मानित केले. यावेळी उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश बोरकर, रश्मी मोगरे त्यांचे सहकारी व त्यांची टीम यांनी श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली.
या आजी माजी विद्यार्थ्यांनी केला रक्तदान. प्राचार्य देवेंद्र फाये, श्रेयस फाये, साहिल फुलबांधे, लक्षीत सोनटक्के, भावेश बावनकर, गौरव सरकार ,मनीष फाये, पिंटू रामटेके,जतीन कापगते, राहुल गिरडकर, प्रल्हाद मानकर, प्रमोद मुंगमोडे, लोकेश हटवार,वैभव भावसागर, रोहिदास निकुरे, नारायण आदमपुरे, मयूर डोमळे, आशुतोष दांडेकर, अक्षय पारधी, विजय लाडे, लक्षित मेश्राम, विवेक गाहणे, राहुल कपूरडेरिया, गणेश चौधरी, अक्षय काळबांधे, दुर्गादास टेंभुर्णे, प्रल्हाद लंजे, शंकर मेश्राम, विष्णू ठाकूर, श्रुती शिरपूरवार, संजय शिरपूरवार, राजू कंगाले, राजकुमार गजपला, प्रवीण खुणे, पूरब तोंडफोडे, मुकेश भैसा, अतुल सिद्राम, खुशाल दूमाने, मंथन उराडे, या आजी-माजी युवकांनी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन पुण्यकार्य केले.
रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिबिर प्रमुख प्राध्यापक विनोद नागपूरकर, हरीश टेलकास्वप्निल खोब्रागडे, ज्ञानेश्वर देशमुख यांनी विशेष सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here