देशी दारुसह ४२ हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट

182

 -गाव संघटना व मुक्तिपथची संयुक्त कृती 
The गडविश्व
गडचिरोली, २८ जानेवारी : मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथील विक्रेत्यांचा ४२ हजार ३२० रुपये किंमतीचा ५ ड्रम मोहफुलाच्या सडवा व  १८९ नग देशी दारू नष्ट केल्याची कृती गाव संघटनेच्या महिलांसह मुक्तिपथ तालुका चमूने केली.
श्रीनगर येथे अवैधरित्या दारूविक्री केली जाते. यामुळे गावातील युवा पिढीला दारूचे व्यसन लागत आहे. गावांमध्ये भांडण-तंट्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या गाव संघटनेच्या महिलांनी दारू विक्रेत्यांना वारंवार सूचना करूनही त्यांनी आपला अवैध व्यवसाय बंद केला नाही. अशातच दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार गाव संघटनेच्या महिला व मुक्तिपथ तालुका चमूने जंगलपरिसरात शोधमोहीम राबवून जवळपास २८ हजार रुपये किंमतीचा 5 ड्रम मोहफुलाचा सडवा नष्ट केला. तसेच गावातील एका विक्रेत्याकडे आढळून आलेली १४ हजार ३२० रुपये किमतीची १७९ नग देशी दारू गावकऱ्यांच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आली. यावेळी श्रीनगर येथील पोलिस पाटील आशा मुजुमदार, शांती बॅनर्जी, सविता सरकार , ललिता मंडल, महाराणी गांगुली,  मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, नम्रता मेश्राम, शालिनी मेश्राम, ज्योती माझी, सुषमा सरकार, तापोशी सरकार, संगीता बुधक, सुशिला बूधक, ममता हलदार , आरती सरकार आदी उपस्थित होते.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here