ग्रामीण भागातील ५० रुग्णांनी घेतला व्यसन उपचार

106

The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : ग्रामीण भागातील रुग्णांना व्यसन उपचार मिळावे यासाठी गाव संघटनेच्या मागणीनुसार गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. नुकतेच विविध गावात आयोजित शिबिरांच्या माध्यमातून एकूण ५० रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला आहे.
दारूचे व्यसन लागलेल्या रुग्णांना उपचार घेणे गरजेचे आहे. परंतु, हा उपचार घेण्यासाठी मोठं-मोठ्या शहरांकडे धाव घ्यावे लागत असल्याने मुक्तिपथने गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम व शहरी भागातील लोकांना तालुका पातळीवर व गावागावात उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत अनेक रुग्णांनी नियमित उपचार घेऊन दारूचे व्यसन सोडले आहे. नुकतेच गडचिरोली तालुक्यातील धुंडेशिवणी या गावातील ११ पेशंटनी उपचार घेतला. कामगड येथे एकदिवसीय व्यसन उपचार शिबिरा दरम्यान एकुण ११ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. चामोर्शी तालुक्यातील विठ्ठलपूर २० पेशंटनी पूर्णवेळ उपचार तसेच बुर्कमलमपल्ली येथील ८ जणांनी शिबिराचा लाभ घेतला. अशा एकूण ५० रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. शिबिराला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञ समुपदेशकांनी मार्गदर्शन केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here