– तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार सुविधा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : जिल्ह्यातील रुग्णांना तालुका पातळीवर वेळेवर उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे व्यसन उपचार तालुका क्लिनिकचे आयोजन केले जाते. मागील आठवड्यात आयोजित विविध तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ५२ रुग्णांनी उपचार घेत दारूचे व्यसन सोडण्याचा निर्धार केला आहे.
दारूचे नियमित व्यसन असलेल्या रुग्णांमध्ये शारीरिक व मानसिक बदल घडून येत असतात. हे व्यसन एक मानसिक आजार असून उपचार घेतल्यास बरा होऊ शकतो, ही बाब मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करून गावा-गावातील रुग्णांना पटवून दिली जाते. दुर्गम, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांना तालुका पातळीवर नियोजित दिवशी व्यसन उपचार मिळावे, यासाठी बाराही तालुक्यात तालुका क्लिनिक आयोजित केली जाते. या क्लिनिकच्या माध्यमातून तज्ञ समुपदेशकांकडून रुग्णांना सल्ला , मार्गदर्शन व औषोधोपचार केला जातो. मागील आठवड्यात विविध तालुक्यातील एकूण ५२ रुग्णांनी व्यसन उपचाराचा लाभ भेटला. यामध्ये गडचिरोली तालुका क्लिनिक येथे १६ पेशंट, आरमोरी तालुका क्लिनिकमध्ये १२ पेशंट, एटापल्ली तालुका क्लिनिकमध्ये ८, मुलचेरा १०, सिरोंचा क्लिनिकमधील ६ रुग्णांचा समावेश आहे,. ज्या रुग्णांना उपचाराची गरज आहे, अशांनी तालुका क्लिनिकचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुक्तिपथ तर्फे करण्यात आले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #muktipath )