६ एप्रिल ला सर्च येथे स्पेशल फिजिओथेरपी ओपीडी

151

The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : सर्च हॉस्पिटल चातगाव येथे ६ एप्रिल २०२४ रोजी स्पेशल फिजिओथेरपी ओपीडी आयोजीत केली आहे.
फिजिओथेरपी उपचारात सांध्याचे दुखणे, स्नायूंचे दुखणे, लचक भरणे, नस लागणे, ऑपरेशन नंतर दैनंदिन जीवनात येणार्‍या शारीरिक अडचणी दूर करणे यावर फिजिओथेरपी उपचार उपयुक्त ठरतो. कंबर व पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, घोटा व टाचदुखी, स्नायुंमध्ये जखडन आणि लकव्याचा त्रास किंवा हातापायांची हालचाल करण्यास त्रास अश्या सर्व प्रकारच्या दुखण्यावर आणि समस्यांवर औषधोपचारा बरोबरच फिजिओथेरपीला विशेष महत्व मिळाले आहे. तरी वरील सर्व दुखण्यावर आणि समस्यांवर नागपूर येथील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. श्रुती गोहाणे यांच्या मार्फत उपचार करून घेण्याचे आवाहन सर्च येथील मणका व सांधे विभागाने केले आहे. या उपचारात विशेष पद्धतीचा आणि उपकरणांचा वापर करून उपचार केले जातील जशे की आयएएसटीएम पद्धती, टेपिंग पद्धती आणि मशीनद्वारे उपचार. तरी या सेवांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि आपले दैनंदिन जीवन सुखकर बनवावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here