The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात येथे बुधवार ०८ मे २०२४ रोजी दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील मुत्रविकार व त्वचाविकार विशेषज्ञ यांचे द्वारे ६२ रुग्णांनी विशेष उपचार सुविधेचा लाभ घेतला.
मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशय पिशवी मध्ये स्टोन असणे,बलघवीची नळी चिपकलेली असणे, मूत्राशय नळीमध्ये स्टोन अटकलेला असणे, प्रोटेस्ट ग्रंथीची वाढ होणे तसेच लघवीतून रक्त जाणे, लघवी अटकत/ थांबत येणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना मूत्रविकार तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध झाली . तसेच शरीरावर पांढरा चट्टा कोड व खाज, मुरूम/ तारुण्यपिटिका, केस गळती, कोंडा होणे, गजकर्ण, खरूज, सोरायसिस, नखांचे आजार तसेच नागिन अशी लक्षणे असलेल्या रुग्णांना त्वचाविकार ओपीडी मध्ये उपचार सुविधा देण्यात आली. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत देण्यात आली.
१५ वर्षाखालील मुलांना सर्च रुग्णालयात विशेष सुविधा देण्यात येत आहे. प्रयोगशाळा, ईसीजी, एक्सरे इत्यादि तपासणीसाठी व डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर १००% सवलत देण्यात येत आहे. मुत्रविकार व त्वचाविकार ओपीडी ही दर महिन्याच्या दुसर्या बुधवारला नियोजित असून जास्तीत जास्त रुग्णांनी या विशेषज्ञ ओपीडीचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन सर्च रुग्णालय करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )