– व्यसनविरोधी जागृती
The गडविश्व
गडचिरोली, २४ डिसेंबर : तंबाखूजन्य पदार्थांबाबत, खर्रा व दारूबाबत वर्ग ५ ते ९ वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुक्तीपथ अभियानाच्या वतीने विविध टप्प्यामध्ये जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. या अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील ३ आश्रम शाळांसह १३ शाळांमध्ये ही स्पर्धा पार पडली. यातून एकूण ६३० विद्यार्थ्यांनी व्यसनाचे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घेतले.
गडचिरोली तालुक्यातील आश्रमशाळा पोटेगाव, आश्रमशाळा मुरमाडी, विनायक सावरकर आश्रमशाळा चांदाळा, जिप शाळा बेलगाव, धुंडेशिवणी, मरेगाव, मुरमाडी, मुरखला, विहिरगाव, अमिर्झा, नगरी, कनेरी, पुलखल या शाळेत कार्यक्रम घेण्यात आले. या १३ शाळेतील एकूण ६३० विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना तंबाखू विरोधी कायद्याची माहिती , दारू, तंबाखू ,खरा, सिगारेट आदींमुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्याचे लक्षात आले. प्रश्नमंजुषा नंतर विद्यार्थ्यांना दारू व तंबाखूचे शारीरिक, आर्थिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तालुक्यातील इतरही शाळेत मुक्तीपथ तर्फे कार्यक्रम घेण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.
सदर जाणीवजागृती कार्यक्रम तीन टप्प्यात पार पडणार आहे. शाळा पातळी, क्लस्टर पातळी व जिल्हा पातळीवर जागृती संबधात विविध कार्यक्रम होणार असून शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व अंतिम टप्प्यात क्रमांक पटकावनाऱ्या शाळांना बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम यांनी केले. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी मिळून प्रश्नमंजुषेचा टप्पा यशस्वी पार पाडला.
(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC)