-विविध ठिकाणी तालुका क्लिनिक
The गडविश्व
गडचिरोली,५ मार्च : दारूच्या व्यसनापासून त्रस्त झालेल्या रुग्णांना तालुकास्थळी उपचार मिळावे, यासाठी मुक्तीपथ तर्फे तालुका क्लिनिक सुरू आहेत. विविध तालुक्यातील ७० रुग्णांनी आठवडाभरातून व्यसन उपचार घेतला आहे.
दारूच्या व्यसनी रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी जिल्हाभरातील बाराही तालुक्यातील मुक्तीपथच्या तालुका कार्यालयात व्यसन उपचार क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. नियोजित दिवशी आयोजित क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना तज्ञांकडून समुपदेशन व उपचार केले जाते. या माध्यमातून आतापर्यंत अनेकांनी उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त झाले आहेत. मागील आठवड्यात धानोरा १६, देसाईगंज १२, भामरागड ४, एटापल्ली १२, कोरची १०, अहेरी ८ व चामोर्शी तालुका क्लिनिकतून ८ रुग्णांनी उपचार घेतला आहे. अशा एकूण ७० जणांनी तालुका क्लिनिकचा लाभ घेतला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Chandrapur Collector) (The Gdv) (IND vs AUS) (Juventus vs Torino) (Jungkook) (Man United vs West Ham) (Justin Bieberl)