The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 19 एप्रिल 2024 रोजी झालेल्या मतदान पक्रियेत एकूण 71.88 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आमगाव विधानसभा मतदार संघात 69.25 टक्के, आरमोरी 73.69 टक्के, गडचिरोली 71.42 टक्के, अहेरी 66.93 टक्के, ब्रम्हपुरी 75.10 टक्के तर चिमुर विधानसभा मतदारसंघात 74.41 टक्के मतदान झाले.
गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लक्ष 17 हजार 702 मतदार आहे. यात 8 लक्ष 14 हजार 763 पुरुष मतदार, 8 लक्ष 2 हजार 434 स्त्री मतदार तर 10 इतर मतदार आहेत. यापैकी 5 लक्ष 95 हजार 272 पुरुष मतदारांनी (73.06 टक्के), 5 लक्ष 67 हजार 157 स्त्री मतदारांनी (70.68 टक्के) तर 5 इतर नागरिक असे 11 लक्ष 62 हजार 434 (71.88 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी कळविले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadvishva)