गडचिरोलीत होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा

684

– विविध उपक्रमांचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, ११ डिसेंबर : शहरात होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ७६ व्या वर्धापन दिन ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रविवार ११ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
होमगार्ड व नागरी संरक्षण दलाच्या ६ डिसेंबर रोजी ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली होमगार्ड जिल्हा समादेशक यांच्या आदेशानुसार व तालुका समादेशक रवींद्र गायकवाड यांचे नेतृत्वात गडचिरोली शहरात होमगार्ड जनजागृती रॅली काढून सेमाना देवस्थान येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सेमाना देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यानंतर वर्धापन दिनाचे औचित्य साधून पथकातील सेवानिवृत्त मानसेवी अधिकारी व सैनिकांचे शाल श्रीफळ, सन्मानचिन्न देवून सत्कार करण्यात आला व होमगार्ड कर्मचारी यांना होमगार्ड व नागरी संरक्षण दलात त्यांचे कर्तव्य जबाबदारीचे योगदान यांची जाणीव मार्गशनातून करण्यात आली. तालुका समादेशक अधिकारी गडचिरोली यांनी तालुका समादेशक होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचे कर्तव्य व जबाबदारीचे योगदान यांची जाणीव याबाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महिला सहायक पोलीस निरीक्षक पूनम गोरे, उदघाटक तालुका समादेशक रवींद्र गायकवाड, प्रमुख अतिथी ठाकरे, वरिष्ठ पलटण नायक संजय बोरसरे, सत्कारमूर्ती माजी तालुका समादेशक अधिकारी पेशेंट्टीवार, माजी पलटण नायक सातपुते, माजी होमगार्ड सैनिक दिलीप येवले, गुरूदास सोनूले, आशाबाई पाथरडे, उषा मेश्राम, गोपिका रामटेके, यांच्यासह अनेक होमगार्ड सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, मुरलीधर पगडपलीवार, पुरुषोत्तम नंदेश्वर, गुणाजी मेश्राम, महेंद्र मेश्राम, भगवान शहारे, राहुल शामकुडे, गुरुदेव भुरसे, हरिदास उंदीरवाडे, बालाजी मेश्राम, प्रफुल ठाकरे, दिपक बोलीवार, मंगला कांबळे, चंद्रकला नरोटे व होमगार्ड सैनिक यांनी पार पाडले, यावेळी कार्यक्रमाप्रसंगी गडचिरोली पथकातील महिला व पुरुष होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमगार्ड सैनिक रुमाजी भुरले, तर आभार संजय बोरसरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here