७९ रुग्णांनी घेतला वेदना व्यवस्थापन आरोग्य सेवेचा लाभ

120

The गडविश्व
गडचिरोली, ०४ : सर्च रुग्णालयात शनिवार ०१ जून २०२४ ला वेदना व्यवस्थापन ओपीडी घेण्यात आली. या ओपीडीमध्ये डॉ. जितेंद्र जैन व सहकारी डॉक्टरांच्या टीम यांनी ७९ रुग्णांची आरोग्य तपासणी व १३ रुग्णांना वेदना निवारण इंजेक्शन देण्यात आले.
सर्च येथील माँ दंन्तेश्वरी रुग्णालयात शनिवारला वेदना व्यवस्थापन ओपिडी झालेली असून ओपीडी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारला नियोजित आहे. वेदना व्यवस्थापन ओपीडी चे मार्गदर्शन मुंबईचे तज्ञ डॉ. जितेन्द्र जैन यांनी केले. ओपीडी मध्ये पाठीचा कणा दुखणे , पाठदुखी, मज्जातंतू वेदना, लंबर स्पॉन्डिलायसिस: सकाळी कडकपणा, पाठीत वेदना, जास्त वेळ बसून राहिल्यास पाठ दुखणे, वाकताना किंवा उचलताना वेदना होणे, मानेचा स्पॉन्डिलायसिस: डोक्याच्या मागील बाजूस डोकेदुखी होणे तसेच पाय आणि हातांमध्ये अशक्तपणा येणे, मानेत कडकपणा जाणवणे, तोल गेल्यासारखे वाटणे, खांद्यापर्यंत मानेच्या वेदना होणे. पाय आणि खांद्यांमध्ये बधिरपणा येणे, मूत्राशयावर ताबा ठेवण्यास कठीण होणे, मागे वाकताना पाठीच्या मध्यभागी वेदना होणे, पाठीच्या कण्याची मागे पुढे हालचाल होताना वेदना होणे,टाचेचे दुखणे, डोकेदुखी यामुळे होणार्‍या वेदना व तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या वेदना या सर्वांवर उपचार करणात आले.
ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत देण्यात आली . तसेच वेदना निवारण इंजेक्शनची (पेन ब्लॉक) मोफत प्रोसीजर सेवा देण्यात आली.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here