– यूट्यूब लाईव्ह माध्यमातून घेता येणार लाभ
THE गडविश्व
मूलचेरा : स्थानिक सहजयोग ध्यान केंद्राच्या माध्यमातून
“माय लाईफ माय मेडिटेशन – युवा भारत , आत्मसाक्षात्कारी भारत” या उद्देशाने सहजयोग ध्यानकेंद्र प्रतिष्ठान पुणे येथुन ऑनलाईन “युवा जागृती सप्ताह 9 ते 16 जानेवारी 2022” दरम्यान लाईव्ह प्रसारीत केला जाणार आहे. तरी या संधीचा लाभ सर्व युवकांनी घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहजयोग समन्वयक स्वप्निल धायडे यांनी केले आहे.
www.yuva.learningsahajayoga.org या वेबसाईट वर आणि learningsahajayoga या युट्युब चॅनेल मार्फत सदर कार्यक्रमाचे प्रसारण 9 ते 16 जानेवारी दसरम्यान दररोज सायंकाळी 5:30 वाजता लाईव्ह सत्रांद्वारे होणार आहे. दररोजच्या 30 मिनिटांच्या सत्राद्वारे युवकांना येणाऱ्या समस्या आणि सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून त्यावर उपाय असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल. या सत्रांत व्यक्तिमत्व विकास , सुज्ञता आणि सारासार विवेक , आत्मविश्वास , चित्ताची एकाग्रता आणि स्मरणशक्तीची वाढ , तणावमुक्त जीवन , भीती आणि मात , रागावर नियंत्रण , संगीत आणि ध्यान ह्या विषयांवर चर्चा आणि ध्यानाद्वारे उपाय शिकविले जातील. आजच्या युगात युवकांना विशेष प्रगती साधण्यासाठी आपल्या आंतरिक शक्तीचा वापर करणे आवश्यक आहे .
युवकांनी अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रं 1800 2700 800 वर संपर्क करावा अथवा www.yuva.learningsahajayoga.org या वेबसाईटवर नोंदणी करावी
सर्व कार्यक्रम विनामूल्य असून याचा लाभ जास्तीतनागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.