ग्रामीण भागातील 94 जणांना नको दारूचे व्यसन

218

गाव पातळी शिबिराचा घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली, दि.११ : गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ तर्फे गावांमध्ये गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. नुकतेच विविध गावांमध्ये पार पडलेल्या शिबिरातून एकूण 94 रुग्णांनी व्यसन उपचार घेत दारूमुळे जीवनात निर्माण झालेल्या समस्या मांडल्या.
अहेरी तालुक्यातील अबनपल्ली येथे एकदिवस व्यसन उपचार शिबिरात एकूण 12 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन मुक्तिपथ तालुका प्रेरक नंदिनीताई यांनी केले. धानोरा तालुक्यातील उमरपाल येथे सघन भेट दरम्यान दुसऱ्या दिवशी गाव पातळी एकदिवसीय शिबिरामध्ये 13 रुग्णांनी उपचार घेतला. चामोर्शी तालुक्यातील धर्मपुर येथे एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात 23 पेशंट ने नोंदणी केली व 20 पेशंट ने पूर्ण उपचार घेतला. स्पार्क कार्यकर्ते पल्लवी चुधरी यांनी नोंदणी केली व विनोद पांडे यांनी शिबिराचे नियोजन केले. भेंडाळा येथील शिबिरातून 20 पेशंट ने पूर्ण उपचार घेतला. छत्रपती घवघवे यांनी समुपदेशन केले व प्रभाकर केळझरकर यांनी केस हिस्ट्री घेतली. भामरागड तालुक्यातील गेर्र येथे एक दिवसीय गाव पातळी व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात 12 पेशंट ने पूर्ण उपचार घेतला. तालुका कार्यकर्ते आबिद शेख व स्पार्क कार्यकर्ते राजेश मडावी यांनी नोंदणी केली व शिबिराचे नियोजन राजेश मडावी यांनी केले. शिबिरासाठी गावातील सालय्या मडावी, मुकेश तलांडी यांनी सहकार्य केले. एटापल्ली तालुक्यातिल अतिदुर्गम गांव मुसरमगुड़ा येथे 17 रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णांची नोंदणी गाव संघटन सदस्य रूपेश मटामि यानी केली. रुग्णाची केस हिस्ट्री दशरथ रमकाम व रुग्णाचे समूपदेशन व ग्रुप शेषण पूजा येलूरकर समूपदेशक यांनी घेतली. शिबिराचे नियोजन व व्यवस्थापन तालुका संघटक किशोर मलेवार व मुक्तिपथ गाव संघटन सदस्य यानी केले. यशस्वी करण्याकरिता मुक्तिपथ गाव संघटन सदस्य कुल्ले गावडे गाव पाटिल, देवू गावड़े भूमय्या, रूपेश मटामी, अशोक गावड़े, करिश्मा मटामी आशा वर्कर, आर.एम.नरोटे मुख्यध्यापक यांनी सहकार्य केले.

(#thegdv #muktipath #gadchirolinews)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here