स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : जिल्हा व तालुका स्तरावरील उपक्रमांमध्ये गडचिरोली जिल्हयाने पटकावला राज्यात प्रथम क्रमांक

1930

The गडविश्व
गडचिरोली, १ सप्टेंबर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपुर्ण देशात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असुन त्यामध्ये राज्यात गडचिरोली जिल्हयाने जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम निमीत्ताने १२ मार्च २०२१ ते १५ ऑगष्ट २०२२ या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चीत करण्यात आले. तसेच आयोजन केलेल्या उपक्रमांची माहिती खास अमृत महोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या https://indiaat7s.nic.in या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते. त्यामध्ये संपुर्ण भारतातुन ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरांवर सर्वात जास्त ४०४२८२ इतक्या उपक्रमांचे आयोजन करुन या संकेतस्थळावर माहिती भरुन महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकाविला आहे. गडचिरोली जिल्हयाने सदर संकेतस्थळावर जिल्हास्तर उपक्रमांच्या ७४५ नोंदी व तालुका स्तर उपक्रमांच्या ६९९३ नोंदी अपलोड करुन राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाने नोडल म्हणुन कार्य करताना सर्व जिल्हा स्तरावर उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) व तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणुन नेमणुक केली होती.
गडचिरोली जिल्हयामध्ये सदर उपक्रम उत्स्फुर्ततेने व यशस्वीरित्या राबविण्याकरीता जिल्हा परिषद, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद (भा.प्र.से) यांनी विशेष नियोजन करुन ग्राम पंचायत स्तर, पंचायत समिती स्तर तसेच जिल्हा परिषद स्तरावर झालेल्या जास्तीत जास्त उपक्रमांचे अपलोडींग संकेतस्थळावर करणेबाबत सर्वांना जबाबदारी वाटुन देऊन ते कार्य पुर्णपणे यशस्वी करुन घेण्याचे कार्य केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी उपक्रमांमध्ये १) विशेष ग्रामसभा २) डिस्ट्रीक्ट डिजीटल रिपॉझेटरी ३) प्रभात फेरी ४) सायकल / तिरंगा रॅली ५) विविध निबंध, वकृत्व व चित्रकला स्पर्धा ६) हर घर तिरंगा उपक्रम ७) पुरातत्व वारसा स्थळांना भेटी ८) शासकीय इमारतींवर तिरंगी विद्युत रोषनाई ९) स्वच्छता मोहिम १०) महिला व किशोरी मेळावे ११) भ्रमणध्वणी दुष्परीनाम मार्गदर्शण १२) गोपाळांची पंगत १३) वृक्षारोपन १४) पर्यावरण संवर्धण शपथ १५) सांस्कृतीक कार्यक्रम १६) स्वराज्य सप्ताह फेरी १७ ) २५ अमृत सरोवरांचे पुनर्जिविकरण व तेथे ध्वजारोहन १८) सामुहिक राष्ट्रगीत गायन आदी कार्यक्रमाचा त्यामध्ये समोवश होता. त्याचेच फलीत म्हणुन गडचिरोली जिल्हयाला राज्य स्तरावर वरील क्रमांक प्राप्त झालेले दिसुन येते.
सदर उपक्रमांकरीता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र एम. भुयार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) रविंद्र कणसे तसेच सर्व तालुक्यातील गट विकास अधिकारी यांनी सहकार्य केले. जिल्हयाला राज्यात उक्त क्रमांक मिळाल्याने सर्व स्तरावर जिल्हा परिषद, प्रशासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

– विविध संघटना व गट विकास अधिकारी यांचे उत्स्फुर्त सहकार्य गडचिरोली सारख्या दुर्गम व आदिवासी जिल्ह्यात संदर उपक्रम उत्तम प्रकारे राबविणे हि फारच प्रशंसनीय व अभिमानास्पद बाब आहे. त्यातच जिल्हा नक्षल प्रभावित असुनसुध्दा गट विकास अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक कर्म. संघटना, ग्रामसेवक संघटना, व्यापारी संघटना यांनी घरोघरी तिरंगा फडकविणेकरीता मोलाचे योगदान दिल्यामुळेच सदर उपक्रम यशस्वीरित्या पार पाडता आला. भविष्यात सुध्दा या संघटनांकडुन असेच सहकार्य लाभेल हि अपेक्षा.

– कुमार आशिर्वाद
(भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here