रेल्वे सुरक्षा दलातील भरतीची ‘ती’ जाहिरात बोगस : विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

255

The गडविश्व
मुंबई : रेल्वे सुरक्षा दलामध्ये नोकरी करु पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे सुरक्षा दलात ( RPF ) कॉन्स्टेबलच्या 900 पदांसाठीच्या भरतीची जाहिरात बोगस निघाली आहे. त्यामुळे या जाहिरातीवर विश्वास ठेऊन कोणीही अर्ज करू नये, असे आवाहन रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर नागपूरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या जाहिरातीमध्ये नागपूर रेल्वे सुरक्षा दलात कॉनस्टेबल पदाच्या 900 रिक्त जांगासाठी भरती सुरु असल्याचं सांगण्यात आले. मात्र नागपूर पोलिसांनी या जाहिराती संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. नागपूरच्या सुरक्षा दलातील रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात बोगस असल्याचं रेल्वे सुरक्षा दलाचे नागपूर मंडळाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी म्हटले आहे.
उत्तर भारतातील काही वेब पोर्टलवर काही दिवसांपूर्वी रेल्वे सुरक्षा दलात तब्ब्ल 900 पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर हजारो तरुण-तरुणी या भरतीच्या तयारीला लागले होते. काही जणांनी तर रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधून तयारीबद्दल मार्गदर्शनही करण्यास सांगितले होते. मात्र रेल्वेकडून अशी कोणतीही जाहिरात दिली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कोणीतरी तरुणांची फसवणूक करत असल्यामुळे आता रेल्वे अधिकाऱ्यांनी समोर येऊन खुलासा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here