सावली : गेवरा (बुज) येथील इसमाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या

297

The गडविश्व
सावली, ३ सप्टेंबर : तालुक्यातील गेवरा (बुज) येथील इसमाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ३, सप्टेंबर रोजी उगजाफकिस आली आहे. नरेश रामचंद्र वाढणकर (५८) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक नरेश रामचंद्र वाढणकर हे दोन दिवसापासून घरातून बेपत्ता होते. कुटुंबातली व्यक्तींनी शोधाशोध केली असता कुठेही आढळून आले नाही. आज शनिवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता वाजताच्या सुमारास घरा जवळील विहिरीवर काही महिला पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत प्रेत तरंगतांना दिसले. यासंदसर्भात माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली असता पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून शवविच्छेदनाकरीता पाठविले. पुढील तपास पाथरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here