The गडविश्व
देसाईगंज, ६ सप्टेंबर : येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आरोग्य सहाय्यक प्रभाकर एम.राऊत यांचे आज ६ सप्टेंबर ला हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले.
राऊत हे आज सकाळी देसाईगंज येथील बाबुराव मडावी महाविद्यालयात कोविड लसीकरण बुस्टर डोज देऊन परत येऊन जेवण झाल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत त्रास सुरु झाल्याने लगेच ग्रामीण रुग्णालयात स्वतः गेले होते. मात्र लागलीच त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचे आकस्मिक निधन झाले.
मृत्यूसमयी ते ५६ वर्षाचे होते. मागील वर्षीच कोरोनामुळे त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली आहेत. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव व आरोग्य विभागातील संदर्भ सेवा वाखानण्यासारखी असल्याने मित्र परीवारातुन त्यांच्या अकस्मात निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.