– जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी साधला प्रशिक्षणार्थाशी संवाद
The गडविश्व
गडचिरोली, ७ सप्टेंबर : एकल ग्रामसभा प्रशिक्षण अंतर्गत ४६ प्रशिक्षकांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून घेतलेले ज्ञान हे इतर ग्रामसभांना देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांचे ज्ञान वाढून ग्रामसभा समृद्ध होतील आणि याचा त्यांना उपयोग होईल. गौणवनउपज प्रकल्पाबाबत विद्यापीठाने डीग्री अभ्यासक्रम सुरू करावा असा मानस त्यांनी व्यक्त केला .या पुढचे ट्रेनिंग हे मार्केटिंग आणि प्रोसेसिंग वर असेल , मार्च २०२३ पर्यंत २५० ग्रामसभांचे प्रशिक्षण पूर्ण होईल असा आशावादही जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थाशी संवाद साधला.
जिल्हा प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या एकल ग्रामसभा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सात दिवसीय प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नूकताच गोंडवाना विद्यापीठात पार पडला . त्यावेळी ते बोलत होते. मचांवर कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे,कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, समाजसेवक देवाची तोफा आदी उपस्थित होते.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले ,गोंडवाना विद्यापीठात गौण वनउपज प्रकल्पावर डिग्री अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या वक्तव्याला दुजोरा देत २०२३ च्या सत्रापासून अभ्यासक्रम सुरू करणार असे आश्वासन दिले. शेताची कामे असतील किंवा धानाची रोवणी असेल त्यानुसार वर्गांचे शेड्युल करण्यात येईल. विद्यापीठ तुमचेच आहे ,ते सदैव तुमच्यासाठी प्रयत्नरत आहे असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
समाजसेवक देवाची तोफा म्हणाले, आतापर्यंत मी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालो. पण या प्रकारचे प्रशिक्षण मी पहिल्यांदा बघतोय ज्यातून ग्रामसभा समृद्ध होते आणि त्यांचा आर्थिक स्तर वाढेल. गोंडवाना विद्यापीठालाही त्यांनी यावेळी या सगळ्या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले . आतापर्यंत १५० ग्रामसभा सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि 181 ग्रामसंभा सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रशिक्षणार्थी अक्षय दोंतुल, चंद्रकांत किचक, बाजीराव नरोटे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणार्थ्यांना डॉ.अमित सेटिया, डॉ. सतिश गोगुलवार, केशव गुरनुले, मुराद अल्ली, देवाजी तोफा, ऍड. लालसू नागोटी, ऍड अश्विनी उईके, डॉ. कुंदन दुपारे, निकिता सरोदे, चेतना लाटकर, नरेश मडावी यांनी प्रशिक्षण दिले.
संचालन आणि आभार गौणवन उपज प्रकल्पाचे समन्वयक डॉ. नरेश मडावी यांनी केले.
