राष्ट्रीय महामार्गावरील लेखा गावाजवळील खड्ड्यात फसला ट्रक

313

– खड्डे देत आहेत अपघातास आमंत्रण
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ सप्टेंबर : गडचिरोली – धानोरा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या राष्ट्रीय महामार्गावर अनेक मोठे खड्डे पडलेले असूनही संबंधित विभाग कुभकर्णाची झोप घेत असून त्यामुळेच येथील खडे दुर्लक्षित असल्याने याच खड्यात मागिल हप्त्यात दुचाकीचा तोल जावून अपघात घडला आणि आता ट्रक फसला. ही मोठी दुर्दैवि घटना असुन सबंधित विभाग मात्र याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे.
गडचिरोलि ते धानोरा मुरुमगाव हा राष्ट्रीय महामार्ग असुन या रस्त्यावर दिवस- रात्र मोठी आणि अवजड वाहणे चालतात. सततच्या रहदारीने आणि पावसाच्या पाण्याने या मार्गावर काकडयेलि आणि लेखा गावाजवळ मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहण चालविने म्हणजे तारेवरची कसरत आहे. अनेक वाहणधारक स्वताचा जिव मुठीत घेवूनच वाहण चालवितात. विशेष म्हणजे येथिल मार्गाने संबंधित विभागाचे कर्मचारी दररोज गडचिरोली वरुण ये-जा करतात परंतु त्यांना दिसत नसावे म्हणून येथिल खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत.
लेखा गावाजवळ पडलेल्या भगदाळात अवजड ट्रक फसल्याने वाहतुकीस अडचण निर्माण झाली आहे. खड्ड्यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांना लहाण वाहनाना, लोकांना कमालीचा त्रास होत आहे . याच खड्ड्यामुळे अपघात झालेले आहेत . त्यामुळे संबंधित विभागावर गुन्हे का दाखल करु नये असा प्रश्न लोक विचारीत आहेत. धानोरा वरून गडचिरोली रस्त्यावरून दररोज कर्मचारी ,विद्यार्थी, अधिकारी, व्यापारी, शेतकरी व नागरिक ये-जा करतात. याच खड्ड्यामुळे शरिरातील मनक्याचा, शोल्डरचा कमरेचा त्रास वाढला परंतु प्रशासनाला याच काहीच देनघेण दिसुन येत नाही. आज ७ सप्टेंबर ला सकाळी या मार्गावरुण जाणारा मोठा ट्रक लेखा गावाजवळ फसला आणि लोकांची पंचायत झाली . त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच दखल घेवुन खड्डे बुजविन्याची मागणी परिसरातिल नागरिकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्याबाबत वारंवार वृत्त प्रकाशित होऊन सुद्धा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. अजून किती लोकांचे अपघात होऊन बळी घेण्याचे वाट पाहत आहे ? बळी घेतल्यावरच याकडे लक्ष देईल का ? अजून पर्यंत या समस्येची दखल कुणीही घेतली नाही ही शोकांतिकाच म्हणावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here