गडचिरोली : शेतकऱ्यांनी मुंडण करत केला राज्य सरकारचा निषेध

228

– अनेक शेतकऱ्यांनी केले मुंडण
The गडविश्व
गडचिरोली, ७ सप्टेंबर : जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी तसेच मेडिगट्टासह शेजारच्या धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे झाले असून आर्थिक संकटात सापडला असतांना शासनस्तरातून आश्वासना व्यतीरिक्त काहीच न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुंडण करत राज्य सरकारचा निषेध केला. सदर आंदोलन काल ६ सप्टेंबर रोजी गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील शेत बांधावर करण्यात आला. सदर आंदोलन कॉंग्रेसच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी केवळ शेतकऱ्यांनी मुंडण केले.
जिल्हयात निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. दुबार पेरणीचे संकट उभे असतांना शेतकरी पुर्णतः आर्थीक संकटात सापडला. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखी पावले उचलली. असे असतांना राज्य सरकार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत न करता केवळ आश्वासनावर आश्वासन देण्याचे काम करत असल्याचा आरोप करीत जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्या घेवून गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मुंडण आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मुंडण करत आंदोलनात सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here