The गडविश्व
चिमूर, ७ सप्टेंबर : तालुक्यातील नेरी येथील जनता विद्यालय तथा क. महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून पर्यवेक्षिका कु. बमनोटे मॅडम, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षक तथा शिक्षिका उपस्थित होते. सर्व पाहुण्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले.
कार्यक्रमाचे संचलन वर्ग ५ अ ची विद्यार्थिनी कु. सानवी भांडे, प्रास्ताविक कु. हर्षदा पिसे व आभार कु. देवयानी चुटे हिने मानले. यावेळी एम. एम. पिसे सर, गराटे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषण कु. बमनोटे मॅडम यांनी केले.
