मोहल्ला क्लिनिकतुन २४ रुग्णांवर उपचार

161

The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १२ सप्टेंबर : शहरातील विविध वॉर्डातील रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी मुक्तिपथच्या वतीने मोहल्ला क्लिनिकचे आयोजन केले जाते. नुकतेच सिरोंचा व एटापल्ली शहरातील वॉर्डांमध्ये आयोजित शिबिराच्या माध्यमातून २४ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
एटापल्ली शहरातील जीवनगट्टा येथे विर बाबुराव शेडमाके युवा सार्वजनिक गणेश मंडळ व मुक्तीपथच्यावतीने मोहल्ला क्लिनिक घेण्यात आले. यामध्ये नवीन ६ व जुने ८ अशा एकूण १४ रुग्णांनी उपचार घेतला. रुग्णाची नोंदणी तालुका संघटक किशोर मलेवार, केस हिस्ट्री स्पार्क कार्यकर्ती रुणाली कुमोटी यांनी घेतली. तसेच रुग्णांचे समुपदेशन छत्रपती घवघवे यांनी केले. यशस्वीतेसाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. सिरोंचा शहरातील वॉर्ड नंबर १४ मध्ये आयोजित क्लिनिकच्या माध्यमातून ११ रुग्णांनी नोंदणी केली तर १० रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. क्लिनिकमध्ये साईनाथ मोहुर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी केस हिष्ट्री घेतली. शिबिराचे व्यवस्थापन व नियोजन तालुका संघटक सुनीता भगत, शंकर गगुरी व स्पार्क कार्यकर्ता साईराम सेनिगारापू यांनी केले. तर क्लिनिकच्या यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते सलाम भाई यांनी सहकार्य केले.

(muktipath) (gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here