– नाल्यात पडून गट्टय्या मलय्या सेगंटी चा झाला मृत्यू
The गडविश्व
अहेरी (Aheri), १३ सप्टेंबर : तालुक्यातील कोलपल्ली येथील गट्टय्या मलय्या सेगंटी व पत्नी शेतात गेले असता शेताच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडल्याने गट्टय्या चा मृत्यू झाला. सदर बाबा जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार (Ajay Kankadalwar) यांना कळताच त्यांनी कोलपल्ली येथे मृतक गट्टय्या सेगंटी च्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली व पुढील कार्यक्रमास आर्थिक मदत केली.
जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतात. पद असो अथवा नसो मात्र गरजू व्यक्तींना वेळीच मदतीचा हात पुढे करीत असतात. त्याचप्रमाणे कोलपल्ली येथील घटनेची माहिती मिळताच सेगंटी कुटुंबाची सांत्वन भेट घेऊन आर्थिक मदत केली.
यावेळी श्रीनिवास राऊत, महेश लेकुर, लक्ष्मण आत्राम, दिवाकर आत्राम, पुरुषोत्तम आईलवार, मनोज सडमेक, पोलिस पाटिल बुच्चा आत्राम व आ.वि.स.चे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते.
(#Gadchiroli, #aheri, #ajay kankadalwar, #zp gadchiroli)