The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १४ सप्टेंबर : ग्राम पंचायत पेंढरी येथे संतगडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा संत तुकोडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान स्पर्धा सन २०२१-२०२२ अंतर्गत जिल्हा स्तरीय तपासणी समितीने भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली.
या वेळी पंचायत समिती गडचिरोली चे गट विकास अधिकारी साळवे, कृषी अधिकारी पदा, स्वच्छ भारत अभियान चे शेंडे हे तपासणी समितीमध्ये समाविष्ठ होते. या वेळी ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या निर्बंध उपक्रमांची माहिती घेण्यात आली त्या नंतर जि. प.शाळा, अंगणवाडी, वैयातिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कामाची पाहणी करण्यात आली.
यावेळी धानोरा पं.स.गट विकास अधिकारी कोमलवार, जुआरे , रवी जांभुळकर, पेंढरीचे सरपंच पवन येरमे, ग्रा.प.सदस्य त्रुशाल येरमे, मंजुशाताई पवार, वनीताताई निकोळे, झाडापापडा चे ग्रां.से. शिवनकर, कुंदन मोहुर्लै, अक्षय लेनगुरे, कौशल्या उसेंडी, प्रिया दूग्गा उपस्थीत होते. प्रास्ताविक व आभार ग्रा.प.पेंढरीचे ग्रामसेवक सी.के.खुने यांनी केले.