The गडविश्व
गडचिरोली, १४ सप्टेंबर : जिल्ह्यातील नर्सेस प्रवर्गातील काहीं प्रमुख व रास्त समस्या सोडवता यावेत ह्या करीता महाराष्ट्र नवनिर्मित नर्सेस संघटना शाखा गडचिरोली रजी. न. 5712/21 चया वतीने सहविचार सभा पत्रकार भवन गडचिरोली येथे दुपारी १ वाजता व कुरखेडा येथे सकाळी १० ते १२ वाजता पर्यंत आयोजित करण्यात आली होती.
सभेला जिल्ह्यातील नर्सेस भगिनी मोठ्यासंख्येने आपल्या समस्या समवेत उपस्थित झाल्या. सभेत 2021-2022 च्या नवीन आकृती बंधात बदल करण्याबाबत चर्चा करण्यात आले, नवीन निर्माण झालेल्या प्राथमिक रोग्या केंद्रामध्ये lhv ह्या पदाचा उलेख नाही म्हणजेच lhv पदे हे कमी करण्यामागे वरीष्ठ शासनाचा हेतू असल्याचे दिसून येते आहे, जिल्ह्यातील आरोग्यसेविक यांचे रिक्त पदे शक्यातितक्या लवकर भरण्याबाबत, व पद भरती करताना प्रथमता कंत्राटी आरोग्य सेविका प्राधान्य देण्यात यावे, सेवेत काम करीतच असताना स्पर्धा परीक्षेत उतरणे क. आरोग्य सेविकां कठीण होत असते तेंव्हा त्यांना काही प्रमाणात सूठ देण्यात यावे, क. आरोग्य सेविका, नियमित आरोग्य सेविका यांचे कार्यभार सांभाळत असल्यास त्यांना त्याचा अतिरिक्त मानदन शासन स्तरावरून मंजूर करावेत, व आ. सेविकांनी जर स्वतःचा कार्यभार सांभाळून, वरीष्ठ कार्यभार स्वीकारला असल्यास त्यांना त्यांच्या बेसिक नुसार अतिरिक्त मानदन अदा करण्या यावे, MPW चे पद रिक्त असल्यास anm किंवा cnm कडे न देता लगतच्या उपकेंद्राच्या mpw कडे देण्यात यावे, LIC चे महिन्याचे कपात नियमित करावेत, प्रत्येक महिन्याची पगार पावती कर्मचाऱ्यांना देण्यात यावेत, उपकेंद्र स्तरावर CHO, CNM, ANM, MPW असे 4 कर्मचारी असताना फक्त रात्री ला काही आकस्मिक आल्यास फक्तं cnm, व anm लाच जबाबदार धरले जाते हे व्हायला नाही पाहिजे, RCH data ventry बाबतची कामे, प्राथमिक आरोग्य केंद्राला डेटा एंट्री ऑपरेटर असताना anm, cnm la जबादर धरू नये, क. आरोग्य सेविका याना सुद्धा वेतन वाड कमपल्सरी देण्यात यावेत, इन्कम टॅक्स TDS बाबत चर्चा करण्यात आली अशा प्रकारे अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आल्या व शासन स्तरावर मागण्याचे पत्रव्यवहार करण्याबाबत ठरविण्यात आले व नर्सेस भगनींन दिलासा देण्यात आला.
ह्या वेळी संघटनेच्या अध्यक्ष श्रीमती विमल अंबालकर, सचिव श्रीमती मीनल वाळके, उपाध्यक्ष ममता गेडाम, सहसचिव बोडवर, कार्याध्यक्ष गोगे, कोष्याध्यक्ष्य लिहितकार, सल्लागार परवीन शेख, सुनंदा सालामे, शोभा गेडाम, निर्मला भोयर, आरती बुटलेकर, गीता वांपर्तिवर, रीना दिकोंडवर, ह्यांच्या मार्गद्शनाखाली सभा पार पडली.