गडचिरोली : हत्तीचा इसमावर हल्ला, एकजण गंभीर जखमी

2556

– उपचाराकरिता कुरखेडा येथील रूग्णालयात भरती

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (Kurkheda), १७ सप्टेंबर : जिल्हयात मागील महिण्यात हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता. दरम्यान काही दिवसांपासून हत्तींचा कळप कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात बस्तान मांडूण आहे. आज १७ सप्टेंबर रोजी तालुक्यातील घाटी या गावालगतच्या कुरखेडा- वैरागड या मुख्य मार्गावरून १०० ते २०० मीटर अंतरावरील जंगल परिसरात हत्तीने इसमावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्ञानेश्वर शामराव गहाणे (४५) रा. कुंबीटोला ता. कुरखेडा जि. गडचिरोली असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, हत्तीच्या कळपाने अनेक दिवसांपासून कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात बस्ताण मांडले आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आज १७ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर गहाणे हे जंगलात गेले यावेळी हत्तीच्या कळपाने हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले. हत्तीने गहाणे यांच्या पायावर पाय दिल्याने पायच मोडल्याचे कळते. कसाबसा हत्तीच्या तावडीतुन त्यांची सुटका करण्यात आली व तात्काळ कुरखेडा येथील रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे व पुढील उपचाराकरिता गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णलयात रेफर करण्यात आले आहे. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. हत्तीचा कळप कुरखेडा -वैरागड मार्गावर असलेल्या घाटी जंगल परिससात पोहचल्याने अवागमण करणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

(Elephant Attack) (Gadchiroli) (Kurkheda)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here